मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल परिसरातील नावलौकिक मिळवलेली व मान . खासदार कै . सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या आशिर्वादाने प्रगतीपथावर असलेली आणि ११५ कोटी ठेवीचा टप्पा पार करुन सहकार क्षेत्रात गरुडझेप घेऊन नावलौकिक मिळवलेली श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२४ते २०२५या वार्षिक कालावधीकरीता सभापतीपदी श्री. सोमनाथ दिपक यरनाळकर तर उपसभापतीपदी श्री. राजाराम बळवंत कुडवे यांची एकमताने निवड करण्यात आली.
मा. निवडणुक अधिकारीसो श्री. समीर जांबोटकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडीची प्रक्रिया पार पडली. या निवडीनंतर नूतन सभापती सोमनाथ यरनाळकर यानीं संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
या निवडीनंतर नूतन सभापती, उपसभापती यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या निवडीवेळी संचालक सर्वश्री उदयकुमार शहा, एकनाथ पोतदार, आनंदराव देवळे, मारुती पाटील, सुखदेव येरुडकर, प्रकाश हावळ, दत्तात्रय कांबळे, आनंद जालिमसर, संचालिका सौ. रुपाली शहा, सौ. रेखा भोसले, कार्यलक्षी संचालक श्री. राहुल शिंदे यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शेवटी कार्यलक्षी संचालक राहुल शिंदे यानीं आभार मानले.