मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड (ता.कागल) येथील पर्यावरण संवर्धनाच्या उद्दात हेतूने गेल्या २५ वर्षात ४ लाख रोपांची निर्मिती करून त्याचे मोफत वाटप करून पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत गेले दोन तप आपल्या जीवनाला वाहून घेतलेल्या मुरगूड येथील वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांना २०२३ चा राजार्षि शाहू प्रेरणा गौरव सन्मान राज्यस्तरीय वृक्षमित्र समाजभूषण पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले.
न्यूज पेपर गंगाधर यांच्या वतिने श्री सुर्यवंशी यांना हा पुरस्कार शाहू स्मारक सभागृह कोल्हापूर येथे सरपंच परिषदेच्या राज्याध्यक्षा सौ राणी बाळासाहेब पाटील , ग्राहक हित संरक्षणचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री जगदिश पाटील व प्रा सौ प्रमोदिनी माने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचे सामाजिक उपक्रम –
▪️१९९२ पासून राष्ट्रीय सणानिमीत प्रतिवर्षी गरीब व गरजू विद्यार्थी-विद्यार्थीनींना गणवेश वाटप
▪️१९९७ पासून प्रतिवर्षी रोपांची निर्मिती व मोफत वाटप .
(१९९७ ते २०२२- सालात ४ लाख रोपांचे वाटप पूर्ण )
▪️२००३ पासून प्रतिवर्षी वृक्षांना राख्या बांधून अनोखा रक्षाबंधन नवा पायंडा.
▪️२००४ पासून प्रतिवर्षी गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त निराश्रीत व निराधाराना ब्लॅकेट वाटप. व उपेक्षितांचे सत्कार
▪️२००५ पासून प्रतिवर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून परिसर, डोंगर माथ्यावर आणि डोंगर पठारांवर लाखो बियांची हवाई पेरणी
▪️कोरोना काळात व्यवसाय बुडालेला लोकांना जीवनोपयोगी वस्तूचे वाटप.
वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचा कार्यगौरव –
▪️’वृक्षमित्र पुरस्कार २००२
▪️पर्यावरण संरक्षण पुरस्कार २००३ (रोटरी क्लब कोल्हापूर )
▪️ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे हस्ते गौरव २००३ (दै. सकाळ वर्धापनदिन)
▪️युवा गौरव ‘पुरस्कार २००४ हस्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर
▪️निसर्ग गौरव पुरस्कार २००४ (उंचगाव) हस्ते सिंधुताई सपकाळ
▪️’भरारी’ ‘ पुरस्कार २०१० (कागल तालुका ग्रामीण पत्रकार संघ) हस्ते प्राचार्य डॉ. विलास पाटील (डाएट)
▪️’बाळूमामा श्री’ पुरस्कार २०१०
▪️शिवम प्रतिष्ठान कोल्हापूर विभाग सन्मानचिन्ह प्रदान (२०११)
▪️(१) संस्थापक : वनश्री मोफत रोपवाटिका मुरगूड (मोफत रोपवाटप उपक्रमांतर्गत) मुरगूड .
१९९७ ते २०२३ पर्यंत ४ लाख रोपांचे मोफत वाटप .
▪️२) संचालक : कोल्हापूर जिल्हा
सहकारी बोर्ड .
▪️३) मा. संचालक : हुतात्मा तुकाराम
वाचनालय, मुरगूड.
▪️४) संस्थापक अध्यक्ष :
मुरगूड शहर निसर्ग मित्र मंडळ, मुरगूड
▪️५) प्रेसिडेंट :
रोटरी क्लब ऑफ मुरगूड (सन २०१२-१३)
▪️६) माजी सचिव :
समाजवादी प्रबोधिनी, शाखा मुरगूड (२००३ – २०१३)
▪️७) माजी कार्याध्यक्ष :
समाजवादी प्रबोधिनी, शाखा मुरगूड (१९९९-२००२)