निसर्गमित्र मंडळाच्या वतीने वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

सातत्यपूर्ण उपक्रमाचे २२ वे वर्ष

मुरगूड ( शशी दरेकर ) : जगवतो वाढवतो पाट राखण करतो, वृक्ष माझा बंधू भाई सात जन्माची करतो. असा संदेश देत आपले संरक्षक बंधू वृक्ष त्यालाच राखी बांधून औक्षण करण्याचा उपक्रम येथील निसर्ग मित्र मंडळाने व महिला निसर्ग मंडळाने गेले बावीस वर्षे सुरू ठेवलाय. रक्षाबंधन निमित्त गेली २२ वर्ष सातत्यपूर्ण हा उपक्रम सुरू असून, या वर्षीही मुरगूड मध्ये  सरपिराजी रोड, जवाहर रोड, म.गांधीरोड, महालक्ष्मी कॉलनी व वाडेकर मळा अशा परिसरामध्ये सुमारे २५० वृक्षांना राख्या बांधून रक्षाबंधन हा पर्यावरणीय सण साजरा केला. मुरगूड व मुरगूड परिसरामध्ये पर्यावरण संवर्धनाचे कृतिशील कार्य करणारे वृक्षमित्र प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धनाची चळवळ  गेले २८ वर्ष व्रतस्थपणे मुरगूड मधून सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून २००३ साला पासून मुरगूड मध्ये वृक्ष रक्षाबंधन हा उपक्रम सुरू केला आहे.

Advertisements

प्रतिवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा उपक्रम संपन्न होतो. यावर्षी महिला मित्र मंडळाच्या अध्यक्षा सौ नीता सूर्यवंशी यांच्या हस्ते व नगरसेविका प्रतिभा सूर्यवंशी, सौ नंदिनी खैरे, सौ.सरीता हळदकर, वैशाली सूर्यवंशी, मुरगुड शहर निसर्गमित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी, एम टी सामंत, सर्जेराव भाट, ओमकार पोतदार, संजय घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणाचा संदेश देणारी एक प्रतिकात्मक मोठी राखी प्रथम येथील गणेश मंदिरासमोरील सप्तपर्णी वृक्षास बांधून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये महिलांनी वृक्षाला हळदीकुंकू लावून त्याच्यावर राख्या बांधून
“हे माझ्या वृक्ष बांधवा तू आम्हा सर्वांचे संरक्षण करत आहेस. प्रदूषणाच्या आघातापासून आमचे रक्षण कर” असे औक्षण केले मुरगूड करांसाठी हा एक  औत्सुक्याचा व कौतुकास्पद विषय प्रतिवर्षी पहावयास मिळतो.

Advertisements

    संजय माने,प्रमोद चौगुले, सुभाष  खैरे , मृत्युंजय सूर्यवंशी,विजय माने, सिध्देश सूर्यवंशी,जगदीश गुरव, प्रथमेश सूर्यवंशी, आदित्य बरकाळे, सौ.ज्ञानेश्वरी टिपुगडे,पार्वती भोई, देविका वाडेकर, कासूबाई चित्रकार, आशालता घोरपडे, सोनाबाई भोई, विद्या कुंभार, माधवी खोत, इंदुबाई मगदूम, लता वडार, मंगल घुमरे पाटील.आदिसह माता भगिनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रवीण सूर्यवंशी यांनी केले तर आभार संकेत भोसले यांनी मानले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!