मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील मुरगुड शहर जेष्ठ नागरिक संघ, निसर्ग वेध प्रतिष्ठान व समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगुड यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदार प्रबोधन करण्यासाठी प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी संचालक जयवंत हावळ यांनी प्रचार फेरीचा उद्देश स्पष्ट केला . प्रचार फेरी हुतात्मा तुकाराम चौक ते मुरगुड नाका नंबर एक पर्यंत काढण्यात आली . मतदार प्रबोधनाच्या दृष्टीने निर्भयपणे शंभर टक्के मतदान करा, प्रत्येक मतदारानीं मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे, मतदानाचा हक्क बजावणे म्हणजे प्रत्येक मतदारांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे अशा अनेक घोषणा देण्यात आल्या.
सरपिराजी रोड मार्गे मुरगूड एसटी स्टँड बस स्थानकामध्ये फेरीची सांगता करण्यात आली .त्यावेळी मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी व सदस्य, निसर्ग वेध प्रतिष्ठान, समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगूड यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नागरिक सदस्य किशोर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.