रस्त्याच्या आजूबाजूच्या गावातील नागरिकांचा जीव मुठीत घेऊन वावर
कागल : अनेक वर्षांच्या मागणीनंतर कोकणचे प्रवेशद्वार असलेला कागल- निढोरी मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे तसेच डांबरीकरणही समाधानकारक सुरू आहे.
पण यामुळे या मार्गावरील पिंपळगाव खुर्द, व्हन्नुर, सिद्धनेर्ली, बामणी, पिंपळगाव बुद्रुक, भडगाव, निढोरी गावातील नागरिकांना रस्त्याच्या अलीकडे पलीकडे असलेल्या शेत वाडीत जाताना, जनावरांना शेताकडे, पाण्यासाठी घेऊन जाताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
रुंदीकरण झाल्यानंतर उसाच्या गाड्या जात असताना त्याच्या डाव्या उजवीकडून भरधाव वेगाने दुचाकी, चारचाकी वाहने जात आहेत. प्रत्येक गावच्या जवळ वेग मर्यादा निदर्शक, स्पीड ब्रेकर, रिप्लेटर बसवण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.