व्हनाळी (सागर लोहार) :
साके ता. कागल येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह चैत्र शुद्ध पंचमी बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ ते बुधवार दिनांक 13 एप्रिल अखेर ह-भ-प महादेव पाटील महाराज (मौजे सा़गाव) व ह-भ-प ज्योती माळगी (नंदीकर) यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. यामध्ये प्रवचन, कीर्तन भजन इत्यादी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कीर्तनकार ह भ प रामचंद्र भिवसे महाराज हंचनाळ, तात्या माने पंढरपूर, पुर्णानंद काजवे कोगनोळी, संभाजी चव्हाण गर्जन, मारुती लवटे हणबरवाडी, महादेव पाटील मौजे सांगाव, शिवाजी तात्या चिंचोलीकर बत्तीशिराळ, यांचे कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.

तसेच दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रम होणार आहे तर बुधवार दिनांक 13 एप्रिल रोजी काल्याच्या कीर्तनानंतर सकाळी दहा ते दुपारी दोन महाप्रसाद वाटप होणार असल्याची माहिती हरिपाठ भजनी मंडळाचे संयोजकांनी दिली आहे.