कोल्हापूर : जिल्ह्यातील बारा ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा दिल्याचा शासन निर्णय ग्राम विकास विभागाच्या वतीने उपसचिव का.गो.वळवी यांनी नुकताच निर्गमित केला आहे.
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याकरिता राज्य निकष समितीची दि. 4 नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. या समितीच्या निकषाप्रमाणे कागदपत्रांची तपासणी करुन खालील तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग देण्यात आला आहे.
- श्री गजानन महाराज मंदिर, खोतवाडी, ता. हातकणंगले, कोल्हापूर
- ग्रामदैवत श्री संतुबाई देवालय, हेरवाड, ता. शिरोळ, कोल्हापूर
- श्री जुगाईदेवी मंदिर, येळवण जुगाई, ता. शाहूवाडी, कोल्हापूर
- श्री क्षेत्र अंबाबाई देवालय, राधानगरी, ता. राधानगरी, कोल्हापूर
- श्री पार्वती मंदिर, वडणगे, ता. करवीर, कोल्हापूर
- श्री विशाळगड तीर्थक्षेत्र, गजापूर – विशाळगड, ता. शाहूवाडी, कोल्हापूर
- सद्गुरु बाळूमामा सत्यवादेवी मंदिर, गुळक्षेत्रे मेतगे, ता. कागल, कोल्हापूर
- श्री गुडाळेश्वर मंदिर, गुडाळ, ता. राधानगरी, कोल्हापूर
- श्री स्वामी समर्थ देवालय, बारडवाडी-जोगेवाडी, ता. राधानगरी, कोल्हापूर
- श्री नृसिंह सरस्वती मंदिर, निगवे (खालसा), ता. करवीर, कोल्हापूर
- महादेव मंदिर, बालिंगे, ता. करवीर, कोल्हापूर
- श्री दत्त मंदिर, शेणगाव, ता. भुदरगड, कोल्हापूर