हुतात्मा दिन पूर्वसंध्येला  दीपोत्सवाने हुतात्म्यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ):

हुतात्मा दिन पूर्वसंध्येला मुरगुड ता. कागल येथील हुतात्मा तुकाराम भारमल या ऐतिहासिक चौकात दीपोत्सव साजरा करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. मुरगुड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या हस्ते या दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी प्रा. डी डी चौगुले, ए पीआय शिवाजीराव करे, जयवंत हावळ, समाधान सोनाळकर यांनी याप्रसंगी आपल्या मनोगतातून क्रांती लढ्यातील हुतात्म्यांच्या क्रांतीकारकांच्या शौर्यगाथांना उजाळा दिला.

यावेळी स्वातंत्र्य सैनिक वारसदार डी.डी चौगुले, शिवप्रसाद बोरगावे, विश्वनाथ शिंदे, विलास भारमल, राजमती परशुराम साळुंखे, सुभाष अनावकर,आनंदा गोधडे, सर्जेराव गोधडे,बबन बारदेस्कर, राणोजी गोधडे तसेच बापूसो गुजर, बी एस खामकर, महादेव वागवेकर, पी व्ही पाटील, शाहू फर्नांडिस, सत्यजित पाटील, संतोष वंडकर, रणजीत सूर्यवंशी, नामदेव भांदिगरे, पांडुरंग घुंगरे पाटील, सिकंदर जमादार
भावेश्वरी मित्र मंडळ जेष्ठ नागरिक संघटना, मुरगुड शहर पत्रकार संघ, मुरगुड नगरपरिषद आरोग्य विभाग कर्मचारी यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
स्वागत बबन बारदेस्कर यांनी केले तर आभार संदीप भारमल यांनी मानले.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!