बातमी

वाघापूरात मेरी मिट्टी मेरा देश अभियानात शूर वीराना वंदन

मडिलगे (जोतीराम पोवार) – वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त स्वातंत्र्यपूर्व काळात हुतात्म पत्करलेल्या व देशासाठी बलिदान दिलेल्या शूर वीर वीरांना वंदन करण्यासाठी मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान राबवण्यात आले या अभियानात शीला फलक अनावरण, वसुंधरा वंदन, पंचप्रण… शपथ, स्वातंत्र्यसैनिक वीरांना वंदन, ध्वजारोहण तसेच घर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले या अभियानात दि.13 ऑगस्ट रोजी उपसरपंच सौ. संगीता शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर दि. 14 ऑगस्ट रोजी माजी सैनिक शंकर घाटगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सरपंच बापूसो रामचंद्र आरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात पार पडले या अभियानात ग्रामस्थांसह माजी सैनिक उत्तम एकल, सर्जेराव एकल, संभाजी दाभोळे, शंकर दाभोळे, गोविंदा दाभोळे, शंकर घाटगे, राजाराम कांबळे, किरण कुरडे, काशिनाथ परीट यांच्यासह सरपंच बापूसो आरडे, उपसरपंच संगीता शिंदे, शिवाजीराव गुरव, सागर कांबळे, धनाजी बरकाळे, कामगार सेलचे भुदरगड तालुका अध्यक्ष बाळासो शिंदे, समाधान कुरडे, राजेंद्र अत्तार, बाळासो दाभोळे, अनिल एकल, ग्रामसेवक तानाजी शिंदे, तलाठी जरग, कोतवाल बाबुराव आरडे सचिव दयानंद कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *