मुरगूडमध्ये पद्मविभूषण उद्योगरत्न रतन टाटा यांना आदरांजली

मुरगुड ( शशी दरेकर ) : पद्मविभूषण उद्योजक आणि भारतासाठी विविध माध्यमातून मदत करणारे समाजभूषण रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या उद्योग विश्वावर आभाळ कोसळले आहे. भारतासाठी कुठलेही मदत कार्यासाठी सर्वप्रथम रतन टाटा हे पुढे असत .त्यांनी केलेली कोरोना काळात मदत असो, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना केलेली मदत असो अथवा भारतावर कोणतेही संकट आले तर सर्वात पहिले मदतीसाठी ते पुढे असत.

Advertisements

या माध्यमातून रतन टाटा सर्वांचेच आदर्श बनून राहिले त्यांना मुरगूड शहरांमध्ये आदरांजली वाहण्यात आली प्रास्ताविक मध्ये बोलताना ओंकार पोतदार यांनी सांगितले की 26/ 11 ताज हॉटेलवर हल्ला झाल्यानंतर त्यातील मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या मुलाचे शिक्षणाची जबाबदारी रतन टाटा यांनी स्वीकारली आपल्या कर्मचाऱ्यांवरती असणाऱ्या दातृत्वाच्या हे सर्वात मोठे उदाहरण मानलं जाईल देशाच्या आलेले प्रत्येक मोठ्या संकटाला सामोर जाण्यासाठी देशाच्या सोबत रतन टाटा हे नेहमी असत आपल्या घरामध्ये मिठापासून ते गाडीपर्यंत सर्व उत्पादने टाटांची आहेत यावरूनच आपल्याशी ते  किती जिव्हाळ्याचे आहेत हे समजून येते.

Advertisements

मनोगतामध्ये बोलताना सोमनाथ यरनाळकर यांनी सांगितले की आपल्या सर्वांनाच माहित आहे की कर्ण किती दानशूर होता मात्र आजच्या युगामध्ये रतन टाटा हे त्याच्यापेक्षा मोठे दातृत्वशील दानशूर व्यक्ती आपणास पहावयास मिळाले या शब्दांजली कार्यक्रमांमध्ये आलेल्या प्रत्येकाने जरा देखील त्यांचे दातृत्व घेतले तरी देशासाठी खूप मोठे योगदान ठरेल यावेळी जगदीश गुरव आणि सुहास सोरप यांनी मनोगते व्यक्त केली यानंतर मौन पाळून रतन टाटा यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिवभक्त सर्जेराव भाट, तानाजी भराडे, शिवाजी चौगुले, संकेत शहा , पवन लाड , संग्राम सोरप, प्रकाश परिशवाड, अनुबोध गाडगीळ, विशाल कापडे, गणेश भाट यांच्यासह नागरिक उपस्थित होते .

Advertisements
AD1

1 thought on “मुरगूडमध्ये पद्मविभूषण उद्योगरत्न रतन टाटा यांना आदरांजली”

  1. I have been surfing online more than 3 hours today yet I never found any interesting article like yours It is pretty worth enough for me In my opinion if all web owners and bloggers made good content as you did the web will be much more useful than ever before

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!