मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड जवळील वेदगंगा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आता जीर्ण होत आला आहे. बंधाऱ्यावर दोन्ही बाजूस असलेले कठडा खांब एकेक करून ढासळत आहेत.त्यामुळे वाहतुकीस हा बंधारा धोकादायक बनला आहे.
खालून पाण्याचा वाहता प्रवाह आहे.पुलावरून शाळेची मुले पायी, सायकल किंवा दुचाकीवरून जातात. वडाप व अवजड वाहनांची पण वाहतूक सुध्दा सुरू असते.तुटलेल्या खांबामुळे वाहतुकीचा अंदाज येत नाही असे वाहन चालकांचे म्हणणे आहे.
पोहायला न येणारी मुली व महिला यांना तर बंधारा पार करतांना खुप भिती वाटते.
याबाबत पाटबंधारे विभागास नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती व्हावी ,मजबुतीकरण व्हावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली !आहे.
या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास बंधारा रोको आंदोलन करण्याचा इशारा मुरगूड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
Your blog is a breath of fresh air in the often stagnant world of online content. Your thoughtful analysis and insightful commentary never fail to leave a lasting impression. Thank you for sharing your wisdom with us.