कागल/ प्रतिनिधी : कागल पंचायत समितीचे कार्य सर्व स्तरावर उल्लेखनीय आहे. चांगल्या कामातून यापूर्वी पुरस्कार मिळाले आहेत .यापुढेही मिळत राहतील. सर्व विभागप्रमुख ,अधिकारी, ग्रामसेवक, आशा ,अंगणवाडी या सर्व कर्मचाऱ्यांच्या मुळेच कागल पंचायत समितीचे कार्य दैदिप्यमान होत आहे .असे गौरवोद्गगार गटविकास अधिकारी सुशिलकुमार संसारे यांनी काढले.
कागल पंचायत समितीच्या कार्यालयात सर्व विभाग प्रमुखांची समन्वय बैठक पार पडली .या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ए एम माळी .सहा. गटविकास अधिकारी उपस्थित होते. शिक्षण विभागाचे प्रमुख गणपती कमळकर म्हणाले,उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कागल तालुका गेली तीन वर्ष सलग प्रथम क्रमांकावर आहे. चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षेत प्रथम क्रमांकावर आहे. लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेचा कायापालट होत आहे .सध्या जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
घरकुल योजनेच्या सुरेखा कांबळे म्हणाल्या,घरकुल योजना ही सर्वांच्या जिव्हाळ्याची योजना आहे .शासन निर्णयाप्रमाणे ःसर्वांच्या कडे घरेःया योजना सुरू आहेत .रमाई आवास योजनेत कागल पंचायत समिती राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तालुक्यातील लाभार्थी लाभ घेऊन संतुष्ट आहेत. पंडित दीनदयाळ घरकुल योजना ,अटल बांधकाम योजना आवास योजना, रमाई योजना, आदींसह घरकुल योजना सक्षमीकरण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
पाणी पुरवठा विभागाचे मोहन कोळी म्हणाले, तेरा गावची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना पूर्ण झालेली आहे. जल जीवन मिशन योजनेत तेरा गावे प्रगतीपथावर आहेत .जर जीवन मिशन 2024 पर्यंत पूर्ण करावयाची आहे.
बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महिला बचत गट विभाग, महिला व बालकल्याण विभाग ,यासह अन्य यांची माहिती विभाग प्रमुखानी दिली.बांधकाम विभागाचे ए जी चांदणेअमित माळगे,संगिता कांबळे,आदि उपस्थित होते.आभार विस्तार अधिकारी डी डी माळी यांनी मानले.