‘टक्केवारी खातोय’ घोषवाक्यांनी महापालिका दणाणली !

‘आप’चे लाचखोरीविरोधात तीव्र आंदोलन; नागरिकांमध्ये संताप

कोल्हापूर (२९ जुलै) : कोल्हापूर महानगरपालिकेत ड्रेनेज प्रकल्पाच्या कामातील लाचखोरीच्या आरोपांवरून ‘आम आदमी पक्षा’ने (आप) महापालिका मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. एका ठेकेदाराने बिले पास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर, ‘आप’ने भ्रष्ट महापालिका यंत्रणेविरोधात आपला संताप व्यक्त केला.

Advertisements

आंदोलकांनी महापालिकेसमोर नोटांचा प्रतिकात्मक पाऊस पाडला, ज्यामुळे लाचखोरीचे स्वरूप स्पष्ट झाले. तसेच, अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक कचरापेट्यांना ‘मी टक्केवारी खातोय’ असे फलक लावून निषेध नोंदवण्यात आला. या अनोख्या आंदोलनामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘मी पैसे खातोय’, ‘माझ्या पगारात भागत नाही’ अशा मार्मिक वाक्यांनी लिहिलेल्या कचरापेट्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या आणि नागरिकांमध्येही या भ्रष्टाचाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता.

Advertisements

या प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ठेकेदाराने दिलेल्या माहितीनुसार, ड्रेनेज प्रकल्पाशी संबंधित बिले काढण्यासाठी अनेक विभागांतील अधिकारी, ज्यात उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, पवडी अकाउंट्स विभागाचे अधीक्षक, शहर अभियंता, मुख्य लेखापाल आणि अतिरिक्त आयुक्त यांचा समावेश आहे, लाचखोरीत सहभागी असल्याचा आरोप आहे.

Advertisements

प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे जबाबदारी सोपवावी, अशी मागणी केली आहे. या आंदोलनामुळे आणि आरोपामुळे महापालिकेतील भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!