शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी पुरस्कारार्थींची यादी २२ मे पर्यंत प्रसिध्द होणार -जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे

कोल्हापूर, दि.17 : राज्यात क्रीडा विभागाच्या वतीने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार्थीची यादी प्रसिध्द करण्यात आली असून यादीबाबत आक्षेप असल्यास क्रीडा संचालनालयाच्या desk14.dsys-mh@gov.in  या ईमेल वर २२ मे २०२३ पर्यंत हरकत / आक्षेप सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

Advertisements

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाद्वारे शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

Advertisements

विहित नमुना https://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा. विहीत कालावधीत प्राप्त होणा-या हरकत / आक्षेप यांचा विचार करण्यात येईल.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!