कोल्हापूर : आज सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून अडकला आहे.
त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढला आहे. पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत. नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे
नदी काठावरील गाव, नदीवर जनावर,धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले.