लालपरीचा ७७ वा वर्धापन दिन मुरगूड बस स्थानकावर उत्साहात संपन्न

नागरीकाना व प्रवाशानां साखर – पेढे वाटून आनंद व्यक्त

मुरगूड ( शशी दरेकर ) : लाल परी म्हणजेच एस टी महामंडळाचा ७७  वा वर्धापन दिन मुरगूड येथील एसटी बस स्थानकावर उत्साहात संपन्न झाला.

Advertisements

       एस टी महामंडळाने स्त्रियांना ५० टक्के प्रवास सवलत दिली आहे.त्याशिवाय जेष्ठ नागरिक,अमृत प्रवास ,विद्यार्थी विद्यार्थिनी, दिव्यांग नागरिक, अशा अनेक सवलती प्रवाशांना दिल्या आहेत.प्रवासाच्या इतर अनेक सुविधा उपलब्ध असल्याने माय भगिनी व अनेक प्रवासी एस टी लाच गर्दी करतात.

Advertisements

पंढरपूर यात्रा ,रेणुका यात्रा, गणेश उत्सव, विद्यार्थी सहली  यासारख्या   सार्वजनिक सेवेसाठी एस टी नेहमी सज्ज असते. म्हणूनच  प्रवाश्यांना एस टी आपुलकीची, जिव्हाळ्याची आणि आपल्या हक्काची वाटते . यामुळेच लाल परीला महाराष्ट्राची जीवन वाहिनी असेही म्हणतात. अशी मनोगते उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.

Advertisements

      ज्येष्ठ नागरिक, प्राचार्य व्हि आर भोसले यांच्या हस्ते वाढदिवस केक कापण्यात आला.शिक्षक बँकेचे व्यवस्थापक चव्हाण , पत्रकार राजू चव्हाण यांनी श्रीफळ अर्पण करून बसचे पूजन केले. व्यापारी नागरी सह . पतसंस्थेचे संचालक प्रशांत शहा यांचे हस्ते गुलाब पुष्पें देऊन एस टी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रवाशांना साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी  अधिकारी ,कर्मचारी, गारगोटी बस स्थानक प्रमुख जठार, सागर पाटील, वाहतूक नियंत्रक शशिकांत लिमकर,परीट, प्रा. भोई, शामराव शिंदे, यांच्यासह अनेक प्रवासी, नागरिक, विद्यार्थी ,विद्यार्थिनी उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!
PM Kisan 20 वीं किस्त: कब और कैसे पाएं ₹2000? India’s Hottest Picks: Top 10 Trending Stocks of 2025! जागतिक वन दिन 2025 Book HSRP Plate Process Step by Step kagal vidhansabha voting 2024