कागलजवळ भीषण अपघात: गोकुळ शिरगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

कागल ( प्रतिनिधी ) : कागल अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा मृत्त्यु झाला. आनंद पाल राहणार गोकुळ शिरगाव असे मयत इसमाने नाव आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सूमारास महामार्गावरील लक्षमी टेकडी जवळ घडला. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisements

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या परीस्थिती कडे दुर्लक्ष करुन कार नंबर ka-23-n-7815 ही ट्रेलरला ओव्हरटेक करुन पुढे आडवी लावली. ट्रेलर वरील चालकाने ट्रेलर क्रमांक NL-01-AD-0220रस्त्यावर अचानक उभा केला. दरम्यान पाठीमागुन भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटरसायकल क्रमांक MH-09-FE-3611ची पाठीमागून जोराची धडक बसली.

Advertisements

मोटर सायकल स्वार पाल हा गंभीर जखमी झाला. त्याचेवर कोल्हापूर यैथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्त्यु झाला. पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बी. एस. कोचरगी हे करीत आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!