अडीच लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ठ -चेअरमन संजयबाबा घाटगे

‘अन्नपूर्णा`चा ६ वा बॅायलर अग्नीप्रदिपन सोहळा

व्हनाळी (वार्ताहर) : गेली ४ वर्षे अतीशय खडतर प्रवासातून मार्गक्रमण करत कारखाना चालवला आहे. सुरूवातीला प्रतिदिन ११०० मेट्रीक टन गाळप केले होते आता. आत्याधुनिक यंत्रसामुग्री वापरून त्यामध्ये मोठे बदल केले आहेत. पुर्वी ४ मिल होत्या यंदा ५ वी झिरोमिल बसवून आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेतल्या आहेत. त्यामुळे गाळप क्षमता वाढून सुमारे २ हजार मेट्रीक टन प्रतिदिन गाळप होणार असून यंदा अडीच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उदिष्ठ ठेवले असल्याचे प्रतिपादन अन्नपुर्णाचे संस्थापक चेअरमन संजयबाबा घाटगे यांनी केले.

Advertisements

केनवडे ता.कागल येथे अन्नपुर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स च्या ६ व्या बॅायलर अग्नीप्रदिपन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. प्रमुख उपस्थित गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे,माजी जि.प.सदस्या सुयशा घाटगे,अरूंधती घाटगे,विरेन घाटगे होते. यावेळी श्री सत्यनारायण पुजा होम, बॅायलर अग्नीप्रदिपन अंबरिषसिंह घाटगे,सुयशा घाटगे पतीपत्नींच्या हस्ते संचालकांच्या उपस्थितीत झाले.

Advertisements

अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, हवाई अंतराचे बंधन असल्यामुळेच आपण जॅगरी प्रकल्प सुरू केला. पुर्वीपेक्षा आता कारखान्यात मोठे बदल केले आहेत.गतवर्षी प्रतिदिन १७०० मेट्रीक टनांपर्यंत ऊस गाळप केले यावर्षी उल्का कंपनीची झिरोमिल यंदा आपण बसविल्यामुळे या गळीत हंगामात २ हजार मेट्रीकटन प्रतिदिन गाळप होईल यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या रिकव्हरीचा ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

Advertisements

कार्यक्रमास संचालक दौलू पाटील,आनंदा साठे,एम.बी‌.पाटील,विश्वास दिंडोर्ले,के.के.पाटील, रणजित मुडूकशिवाले,राजू भराडे, सुभाष करंजे,चिफ इंजिनिअर राजू मोरे, चिफकेमिस्ट सुनिल कोकीतकर, चिफ अकाउंटंट शामराव चौगले, शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी,एन.एस.पाटील, एच.एस.पाटील डि.एस.पाटील,कृष्णात कदम,विष्णू पाटील,दता सावंत, शामराव पोवार, लखन गोधडे, अशोक पाटील, संजय सुतार, धोंडिराम एकशिंगे, के.बी.वाडकर आदी शेतकरी सभासद उपस्थित होते. आभारी मल्हारी पाटील यांनी मानले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!