निधन वार्ता
निधन वार्ता – शेवंता महादेव चांदेकर
मुरगूड प्रतिनिधी – मुरगुड ता. कागल येथील शेवंता महादेव चांदेकर वय ८८ यांचे वार्धक्याने निधन झाले . त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुरगूडचे माजी नगरसेवक बाजीराव चांदेकर तसेच आनंदा व नामदेव चांदेकर यांच्या त्या आई होत. उत्तर कार्य शुक्रवार दिनांक २ रोजी मुरगूड येथे आहे.
निधन वार्ता – ईश्वरा खराडे
शिंदेवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक ह .भ.प . ईश्वरा दत्तु खराडे रा. शिंदेवाडी ता. कागल यांचे मंगळवार दि. १२/०८/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. १३/०८/२०२५ रोजी सकाळी ९ वा वैकुंठ स्मशानभूमी शिंदेवाडी येथे आहे.
निधन वार्ता – यशवंत पोवार
श्रीपेवाडी ता. निपाणी येथील प्रगतशील शेतकरी यशवंत जानबा पोवार ( वय ८९ ) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. ८/६/२०२५ रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, दोन मुली , सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ९/६/२०२५ रोजी सकाळी ९ वाजता श्रीपेवाडी येथे आहे.
निधन वार्ता – श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील
श्रीमती शेवंताबाई मारूतराव सुर्यवंशी-पाटील मुरगूङ याचे वार्धक्याने दिनांक २१.५ .२०२५ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. मुरगूड येथिल शिवगड अध्यात्मिक ट्रस्टचे खजिनदार व इंजिनिअर बाळासाहेब सुर्यवंशी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचे पश्र्चात दोन मुले,दोन मुली नातवंडे सुना असा परिवार आहे,रक्षा विसर्जन रविवारी सकाळी ९ वा आहे.