
मुरगूड (शशी दरेकर) : येथील स्वराज्य स्पोर्ट्स च्या वतीने ५ ते ९ मार्च दरम्यान मुरगूड येथे कागल तालुका प्रिमिअर लिग २०२५ स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धांचे(डे नाईट) उद्घाटन कागल चे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वळूंज हे होते.
यावेळी मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि शिवाजी करे, संताजी शुगरचे कार्यकारी संचालक संजय घाटगे, निढोरीचे माजी सरपंच देवानंद पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र शिंदे, प्राचार्य जी के भोसले, पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष राजू चव्हाण, भडगाव चे सरपंच बी एम पाटील, निवास कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक सुशांत मांगोरे यांनी केले. यावेळी रमेश वाइंगडे, विकी बोरगावे नंदूकिशोर खराडे, सागर सापळे, पंकज नेसरिकर, सत्यजित चौगूले, अनिकेत बेनके, अमित तोरशे, सुनिल कांबळे, नंदू चौगुले,अनिकेत नलवडे, विशाल भोपळे, सुहास घाटगे यांच्या संयोजनातून उद्घाटन पार पडले सूत्रसंचालन अमर कांबळे यांनी तर आभार कुरुकली गावचे डेप्युटी सरपंच गिरीराज पाटील यांनी मानले.
Wow wonderful blog layout How long have you been blogging for you make blogging look easy The overall look of your site is great as well as the content