मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्य गुरुवार ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत श्री. स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा पादुकापूजन, श्रींच्या आरतीने उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
यावेळी अक्कलकोट येथिल स्वामी समर्थ महाराज व पादुकांचे स्वागत संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालकानी केले. या कार्यक्रमासाठी व्यापारी पतसंस्थेच्या प्रांगणात भव्य मंडप घातला होता. रंगीबेरंगी फुलांच्या माळा लाऊन मंडपाची सुंदर सजावट केली होती.
यावेळी मडिलगे येथिल भजनी मंडळाने टाळ-मृदुंगाच्या तालातील भजनाने भक्तजन मंत्रमुग्ध झाले होते . श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत श्री स्वामी समर्थ महाराज पालखी पादुका परिक्रमा सोहळा मुरगूच्या बाजारपेठेत प्रथमच साजरा केल्याने स्वामी भक्तानीं पादुकांचे दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती . या सोहळ्यानिमित्य लाडू , पेढ्यांच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडे दैनदिन अन्नछत्र योजनेअंतर्गत अन्नदानापित्यर्थ वैयक्तीक संचालक मंडळाकडून व संस्थेकडून २१०००रु. अन्नछत्रासाठी सुपुर्द करण्यात आले. या पालखी पादुका सोहळ्यासाठी श्री व्यापारी नागरी पतस्थेचे विद्यमान चेअरमन श्री किरण गवाणकर, व्हा. चेअरमन प्रकाश सणगर , संचालक सर्वश्री प्रशांत शहा, किशोर पोतदार, साताप्पा पाटील, शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, हाजी धोंडीबा मकानदार, निवास कदम, संदीप कांबळे, संचालिका सौ. रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी वर्ग यांच्यासह सुरेश जाधव, शिवाजी तांबट, आकाश रेदाळे, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत माळवदे, चंद्रकांत जाधव, श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे जेष्ठ संचालक दत्तात्रय तांबट, विनय पोतदार, नवनाथ डवरी, नागरीक, व्यापारी बंधू , महिला वर्ग, स्वामी भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.