गडहिंग्लज : इचलकरंजी येथील रहिवासी असलेल्या सुशीला नवलाप्पा नाईक वय वर्षे 86 यांनी गेली 20 वर्षे डोक्यावरी सोसलेला भल्या मोठ्या जटेचा भार गडहिंग्लज येथील अनिंसच्या कार्यकर्त्यांनी उतरवला.
श्रीमती नाईक या दिवाळी सणानिमित्त ममेवाडी तालुका आजरा येथे नातेवाईकांच्याकडे आल्या होत्या. येथील अनिंसचे कार्यकर्ते संतोष पाटील व सौ शीतल संतोष पाटील यांनी त्यांचे प्रबोधन केले .त्यांना जटा मुक्त करण्यासाठी गडहिंग्लज येथे प्रा सुभाष कोरे यांच्या घरी घेऊन आले .या ठिकाणी अनिंसचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रकाश भोईटे व प्रा .सुभाष कोरे यांनी श्रीमती नाईक यांचे अधिक प्रबोधन करून त्यांना जटामुक्त केले.
वीस वर्षांपूर्वी त्या दोन महिने आजारी होत्या दरम्यान केसांचा गुंता झाला होता त्यावेळेपासून आत्तापर्यंत अंगात येणाऱ्या स्त्रियांनी व देवरस पण करणारया अनेक लोकांनी घरावर संकट येईल अशी अनामिक भीती घालून त्यांना जटा काढू दिल्या नव्हत्या. मात्र गडहिंग्लजच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जटा मुक्त केले . यावेळी प्रज्ञा प्रकाश भोईटे यांनीही सहकार्य केले . तसेच यावेळी श्रीमती नाईक यांची दोन मुले विठ्ठल व चंद्रकांत उपस्थित होते. तसेच रामदास मोरवाडकर, आदिनाथ मोरवाडकर, महादेव विठ्ठल नाईक हे देखील उपस्थित होते. जटा मुक्त केल्याबद्दल श्रीमती नाईक यांच्या परिवाराने कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.