मुरगूड ( शशी दरेकर ): मराठा समाजाच्या मागण्यांसाठी शनिवारपासून खा. संभाजीराजे मुबईत आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी समाजबांधव कोल्हापुरात साखळी उपोषणास बसले आहेत या आंदोलनास पाठिंबा म्हणून मुरगूड येथील सकल मराठा समाज आणि मुरगूड शहरातील नागरिकांनी फेरी काढून बस स्थानकाजवळ बैठे आंदोलन केले.
एक मराठा लाख मराठा ,मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, आम्ही संभाजीराजेंसोबत, “राजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है “अशा घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून सोडला. खासदार संभाजीराजे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी समाज माध्यमांवर संध्याकाळी सहा वाजता गणेश मंदिर येथे जमण्याचे आवाहन करण्यात आले होते यानुसार संध्याकाळी पाच वाजल्यापासूनच गणेश मंदिराजवळ नागरिकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली होती या नंतर गणेश मंदिरापासून बस स्टँड पर्यंत फेरी काढण्यात आली.
त्यानंतर बस स्थानक येथे बैठे आंदोलन करून संभाजी राजे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. यावेळी स्वागत राजू चव्हाण, यांनी तर प्रास्ताविक सोमनाथ येरणाळकर यांनी केले सानिका स्पोर्ट्स अध्यक्ष दगडू शेणवी यांनी मनोगत व्यक्त केले आभार सुशांत मोरे यांनी मानले यावेळी युवराज सूर्यवंशी, अनंत फर्नांडिस, ओंकार पोतदार,दत्तात्रय साळोखे, नंदकिशोर खराडे,शुभंम भोसले, गणेश तोडकर,उदय हासबे,सागर सापळे, प्रमोद रामाने, संकेत भोसले,अभिजीत मिठके, अशोक खराडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि मुरगूड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते