पर्यटन क्षेत्रात महिलांना आई योजनेची साथ

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): राज्‍य शासनाच्या पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरणाअंतर्गत पर्यटन व्यवसायासाठी महिला उद्योजकांना नवीन प्रकल्पासाठी बँक 15 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर करुन देत असून त्या कर्जाचा हप्ता भरल्यास त्यावरील व्याजाची रक्कम (12 टक्क्यांच्या मर्यादेत) कर्ज परतफेड होणार आहे. या योजनेचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

Advertisements

महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक उभारणीसाठी किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन प्रकल्पांना अधिक चालना देण्याच्या उद्देशाने ‘आई’ ही योजना अत्यंत हितकारक असून योजनेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.- हा व्यवसाय अर्जदार महिलेच्या मालकी हक्काचा हवा. अथवा जॉईंट प्रकल्पात 7/12 उताऱ्यावर महिला अर्जदाराचे नाव असावे. 

Advertisements

www.gras.mahakosh.gov.in या लिंकवर जाऊन 50 रुपये ऑनलाईन प्रक्रिया शुल्क असणार आहे. अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरता येणार आहे. पुणे विभागातील अर्जदारांनी पर्यटन संचालनालय, पुणे इथे अर्ज पाठवावा. अर्ज भरुन स्वीकारल्यानंतर पर्यटन संचालनालयातर्फे पात्रता प्रमाणपत्र (LOI) अर्जदाराला पाठवले जाईल. हे प्रमाणपत्र मान्यताप्राप्त बँकेत दाखवून 15 लाख रु. पर्यंत कर्ज काढू शकता येते.

Advertisements

वेळेत कर्जाचा हप्ता भरल्यास त्यातील व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) कर्ज परतफेड किंवा 7 वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम 4.50 लाख रु.च्या मर्यादेपर्यंत जे आधी घडेल तो पर्यंत व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालय व्याज परतावा स्वरुपात अदा करेल. मर्यादित कालावधीसाठी ही योजना सक्रिय राहील. ‘आई’ योजनेची अधिक माहिती www.maharashtratourism.gov.in पर्यटन संचालनालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

AD1

5 thoughts on “पर्यटन क्षेत्रात महिलांना आई योजनेची साथ”

Leave a Comment

error: Content is protected !!