कागल(विक्रांत कोरे) : रामकृष्णनगर करनूर ता. कागल येथील सौ. शुभांगी भाऊसो नलवडे वय वर्ष 42 यांनी राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी ८.३० च्या सुमारास घडली.
आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली असून, अधिक तपास महिला पोलीस नाईक पाटील मॅडम करीत आहेत. त्यांच्या पश्चात सासू, पती, एक मुलगा, एक मुलगी, दीर, जाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दिनांक 2 रोजी सकाळी आहे.