कागल (विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील 57 वर्षे इसमाने दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी साडेतीन वाजलेचे सुमारास बाळासो धामण्णा यांचे शेतात घडली. काडगोंडा शिवगोंडा धामण्णा रा. सुळकुड, असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. आत्महत्येची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे.
मयत काडगोंडा धामण्णा याने कसबा सांगाव हद्दीत असलेल्या बाळासो धामण्णा यांचे गट क्रमांक १२११ या शेतातील आंब्याच्या झाडास दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजून येत नाही. पोलीस हवालदार श्री भाट हे पुढील तपास करीत आहेत.