कोल्हापूर : चालू गळीत हंगामात एफआरपीपेक्षा जास्त दर मिळेल नाही हे शेतकऱ्यांना माहिती असून ही साखर कारखान्यासाठी ऊसतोड करणाऱ्या ऊसतोड मजुरांकडून प्रतिटन उसामागे १०० रुपये सक्तीने घेतले जात आहेत. एकीकडे ऊस तोडणी-ओढणीची रक्कम मिळत असतानाही शेतकऱ्यांकडूनही आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि ज्यांची चाळीस ते पन्नास टनांपेक्षा जास्त ऊसतोड होत आहे, अशा शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
जिल्ह्यात सर्वत्र साखर कारखान्यांकडून जोमाने ऊसतोड केली जात आहे. अनेक कारखान्यांवर अपेक्षित ऊसतोड कामगार नसल्याने उस तोड थांबली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःहून ऊसतोड करावी, असे अनेक कारखान्यांकडून आवाहन केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःहून ऊसतोड करण्याचे नियोजन होत नाही, त्या शेतकऱ्यांकडून कारखान्यांचे ऊसतोड मजूर प्रतिटनामागे १०० रुपये घेत आहेत. ज्यांची पन्नास टन ऊसतोड आहे त्यांना ५००० रुपयांना फटका बसत आहे. तसेच उस वाहतूक करणारा ही पैश्याची मागणी करत आहे.
पन्नास टन उसाचे सरासरी तीन हजार रुपयांप्रमाणे दीड लाख रुपये होतात. हे १४ महिन्याचे उत्पन्न असून महिना सरासरी १२५००/- मिळतात त्यातून रासायनिक खते, मजुरी, मशागत वजा केल्यात तर त्याला पदरचे पैसे त्यामध्ये घालावे लागत आहेत. यापैकी पाच हजार रुपये केवळ ऊसतोडणी करणाऱ्यांनाच द्यावे लागत आहेत, तर उर्वरित रकमेपैकी पीक कर्ज, मुलांच्या शाळांचा खर्च, सण-समारंभ याशिवाय घर खर्च चालवावा लागतो. याचे जरासुद्धा सोयरसुतक नसलेल्यांकडून गोरगरीब शेतकऱ्यांना लुटले जात आहे.
शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार बसत आहे. यावर तक्रार कोणाकडे करायची हेच शेतकऱ्यांना समजत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सुमारे सर्वच साखर कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची राजरोस लूट सुरू आहे. याबाबत साखर कारखान्यांकडे तक्रार केली, तरीही त्याची दखल घेतली जात नाही. तुम्ही पैसे देणार नसाल, तर आम्ही तुमचा ऊस तोडणार नाही, म्हणून शेतकऱ्यांना धमकी दिली जात आहे.
यातून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे अतिवृष्टी, पुरातून कसाबसा वाचवलेला ऊस वेळेत तोडला जावा, यासाठी शेतकऱ्यांकडून विनंती केली जात असताना त्यांच्यावर आर्थिक लुटीचे दुसरे संकट उभे ठाकले आहे.
पैसे दिल्याशिवाय ऊस तोडणार नाही, अशी जाहीर भूमिका ऊसतोड मजुरांकडून घेतली जात आहे. एकीकडे उसाला मिळणारा दर हा उत्पादन खर्चानुसार मिळत नाही. यातही तेरा ते चौदा महिन्यांनंतर ऊस तोडला जात असताना ऊसतोड मजुरांकडून होत असलेल्या आर्थिक लुटीसमोर शेतकरी हतबल झाला आहे त्यातून एक तर तो आत्महत्या तर करतोय किंवा शेती विकून मजुरीस दुसरी कडे जातो हे वास्तव आहे. – ऊस उत्पादक शेतकरी
सत्य परिस्थिती आहे प्रशासनाकडे याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. योग्य ती कारवाई केली पाहिजे.
Glue Dream strain Great information shared.. really enjoyed reading this post thank you author for sharing this post .. appreciated