
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहराचे अनेक प्रलंबित प्रश्नांची दखल घेवून ते ताबडतोब सोडविण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड राणाप्रताप सासणे यांनी सादर केले .
कोल्हापूर दौऱ्यावेळी ॲड . राणाप्रताप रामराव सासने- मुरगुडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून मागण्यासंदर्भात चर्चा केली . शक्तीमार्गाचा फेरविचार करावा व कोल्हापूर शहराची हद्दवाढ तात्काळ करावी .पंचगंगा पाणी प्रदूषण प्रश्न मार्गी लावा, अंबाबाई देवस्थान विकास आराखाडा, रस्ते विकास इत्यादी बाबत तसेच कागल तालुक्यातील मुरगूड शहराचे प्रलंबित प्रश्न सोडविण्या संबधी ॲड सासणे यांनी मागणी केली.
मुरगूड येथे कागलचे उप न्यायालय सुरु करावे . आठवडयातून दोन दिवस तहसीलदार कार्यालय कामकाज मुरगुड येथे चालावे, कुरणीच्या माळावरील मिनी एमआयडीसी स्थापन करावी. मुरगुडचा पाणी प्रश्न मार्गी ‘ ” लावावा तसेच कागल तालुक्यातील वाड्यावस्त्यावरील रस्ते विकासाबाबत निवेदनही ॲड सासणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले .त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी त्या खात्याच्या मंत्रीमहोदयांना व सचिवांना सूचना देणेत येतील असे मुख्यमंत्र्यांनी अश्वस्त केले.