कोल्हापूर (जिमाका): चिकोत्रा प्रकल्पाच्या चिकोत्रा नदी भागामध्ये पाटबंधारे विभाग (दक्षिण)चे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी पाटबंधारे अधिनियम 1976 नुसार शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर उपसाबंदी लागू केली आहे.
चिकोत्रा नदी को.प. बंधारा 1 ते को.प. बंधारा 29 (बेळुंकी) वर दि. 5 ते 14 डिसेंबर 2024 तसेच दि. 31 डिसेंबर 2024 ते 9 जानेवारी 2025, 26 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2025, 21 फेब्रुवारी ते 2 मार्च 2025, 15 मार्च ते 24 मार्च 2025, 6 एप्रिल ते 15 एप्रिल 2024, 28 एप्रिल ते 7 मे 2025 व 20 मे ते 29 मे अशा प्रत्येकी दहा दिवसांसाठी उपसाबंदी करण्यात येणार आहे.
उपसाबंधी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही. तसेच उपसाबंदी कालावधीत क्षेत्रीय परिस्थितीनुसार बदल करण्यात आल्यास आपल्या कार्यालयास अवगत करण्यात येईल.