मडिलगे(जोतीराम पोवार) : आदमापूर तालुका भुदरगड येथील विविध प्रलंबित विकास कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा यासाठी काँग्रेसचे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक व बाजार समितीचे माजी संचालक सचिन घोरपडे व लोकनियुक्त सरपंच विजय गुरव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
यात श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामाच्या दर्शना करता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोव्याकडून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या, पोर्णिमा व आठवड्यातील प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात मात्र येणाऱ्या भाविकांसाठी अपुऱ्या व पुरेशा निधी अभावी सोयी सुविधा उपलब्ध करता येत नाहीत याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी आदमापुरच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सतेज पाटील यांचा धनगरी घोंगडी व बाळूमामांचा चरित्र ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एम डी पाटील, मा. सरपंच ज्येष्ठ नेते श्री एस के पाटील, श्री बाळासो गुरव, ओबीसी जिल्हाध्यक्ष एल जी पाटील, आनंदा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते