इयत्ता दहावीत 90 टक्के गुण ; शैक्षणिक क्षेत्रातही तो आघाडीवरचं
व्हनाळी (सागर लोहार) : साके ता.कागल येथील पैलवान सिद्धार्थ रविंद्र इंगळे यांने कुस्ती क्षेत्राबरोबरच इयत्ता दहावीचेही उत्कृष्ठरित्या मैदान मारले आहे. त्याला इयत्ता दहावीमध्ये 90 टक्के गुण मिळाले आहेत. शिवछत्रपती कुस्ती संकुल बाचणी येथे वस्ताद तानाजी गवसे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम व कुस्तीचा सराव करत आहे. राज्यस्तरीय,विभागीयस्तरीय आणि जिल्हास्तरीय निवड चाचणीमध्ये त्याने विषेश प्राविण्य दाखवत सिद्धार्थ ने प्रथम क्रमांक पटकावून कुस्ती क्षेत्रात उल्लेखनिय यश संपादन केले आहे.
न्यू हास्कुल व ज्युनिअर कॅालेज बाचणी ता.कागल येथे दिवसभर शिक्षण घेत त्याने 90 टक्के गुण मिळवले. कुस्ती क्षेत्रात तो राज्यपातळीवर खेळला आहे. मुळचा कर्नाटक येथील असलेला सिद्धार्थ शिक्षणासाठी साके येथे वास्तव्यास असून त्याची आर्थिक परिस्थीती बेताची आहे. गेली सहा वर्षे वस्ताद तानाजी गवसे यांकडेच राहून सिद्धार्थ कुस्ती व शाळेचे शिक्षण पुर्ण करत आहे. त्याला वर्गशिक्षक व्हि.डी.पाटील मुख्याध्यापक ए.आर.खामकर यांचे मार्गदर्शन तर वडील रविंद्र इंगळे आई दिपाली इंगळे यांचे प्रोत्सहान मिळाले.