मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता. राधानगरी येथील ” जिज्ञासा प्री-प्रायमरी स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमी भारतात नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्य सरवडे येथिल जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूलमध्येही कृष्णभक्तीचा जागर झाला. स्कूलमधील लहान मुले-मुली कृष्णाच्या व वेगवेगळ्या वेषभूषात आलयामुळे सरवडे येथे हा कौतुकाचा विषय ठरला .स्कूलमध्ये गाण्यांच्या तालावर नृत्याविष्कार करणारी, भजनात दंग झालेली, व दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात रममान झालेली लहान मुले -मुली या उत्सवात दंग झाली होती.
या श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवासाठी स्कूलच्या तेजश्वीनी रेपे, सौ. दिपाली रेपे मॅडमसह मुला-मुलींच्या आई-वडीलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.