
भक्तांनी नवीन मंदिर उभारणीचा केला संकल्प
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रामनवमी भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी सकाळी महाअभिषेक होऊन महाआरती झाली. त्यानंतर ह भ प श्रीरंग पाटील महाराज हळदी करवीर यांचे कीर्तन पार पडले. यानंतर बारा वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. यानंतर उपस्थित महिलांनी पाळणा गायिला. संध्याकाळी भजन सोहळा झाला. यावेळी सुंठवडा आणि लाडूचे वाटप करण्यात आले.
शहरातील राम भक्त आणि मुरगुड उपखंड मधील सर्व भक्तांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते. सकाळपासूनच प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भावीक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी श्रीराम मंदिर संयोजन समिती आणि भक्त मंडळी यांनी नवीन श्रीराम मंदिराचा संकल्प केला .येत्या वर्षभरात नवीन मंदिर उभारण्याचे उद्दिष्ट ठेवूनच कार्य करायचे असा संकल्प यावेळी भक्तांनी सोडला. या सोहळ्याची नियोजन मंदिराचे पुजारी अनुबोध गाडगीळ, शिवभक्त सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, प्रकाश पारिशवाड, आनंदा रामाने, धनंजय सूर्यवंशी. शिवाजी चौगुले, पप्पू कांबळे, अमोल मेटकर,महेश कुलकर्णी याच्यासह रामभक्त व शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते .