मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल महालक्ष्मी विकास सेवा संस्थेच्या सभापतीपदी शिवाजीराव विठ्ठल चौगुले तर उपसभापतीपदी डी .आर .पाटील यांची निवड झाली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यात या निवडी करण्यात आल्या.
जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या या महालक्ष्मी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक मार्च महिन्यात बिनविरोध झाली. त्यानंतर महालक्ष्मी विकास संस्थेच्या पहिल्याच बैठकीत सभापती व उपसभापती यांची निवड करण्यात आली. ही निवड बिनविरोध होण्यासाठी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी नगराध्यक्ष पांडुरंग भाट .माजी नगरसेवक एम.डी. रावण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बिनविरोध निवड झालेले नूतन संचालक मंडळ असे- शिवाजीराव विठ्ठल चौगले (सभापती),
दत्तात्रय रामगोंडा पाटील (उपसभापती )
विलास ज्ञानदेव सूर्यवंशी, प्रकाश कृष्णा साळोखे, प्रकाश ज्ञानदेव भोसले ,रामचंद्र अनंत गुरव, बाळू भाऊ मेंडके, भैरवनाथ दादू हेंदळकर( कर्जदार गट)
सुरेश गणपती कांबळे (मागासवर्गीय गट),
अमोल आप्पासो मेटकर (भटक्या विमुक्त जाती)
पीरमहम्मद जहाखाँन जमादार( इतर मागास वर्ग) मंगल सखाराम चौगले व सरिता मारुती हळदकर (महिला गट)