मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड ता .कागल येथिल शिवाजी विद्या मंदिर मुरगुड नं.२ या शाळेमध्ये आधुनिक पद्धतीने परसबाग तयार करण्यात आली आहे . यासाठी संपूर्णतः परसबाग ही ठिबक सिंचनावर असून यासाठी मल्चिंग पेपरचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे परसबागेत कोणत्याही प्रकारचे तन उगवणार नाहीत. त्यामुळे वेळ व श्रम यांची बचत होणार आहे .तसेच परसबागेसाठी संपूर्णतः सेंद्रिय खत म्हणजेच शेण खत व कोंबडी खताचा वापर करण्यात आला आहे.यामुळे निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना सेंद्रिय भाज्या आहारामध्ये मिळणार आहेत.
तसेच मुलांना आहारामध्ये भाज्यांची देखील आवड निर्माण करण्याचा हेतू आहे.आठवड्यातून दोन वेळा ठिबक सिंचना द्वारे परसबागेला पाणी दिले जाते. सध्या परसबागेमध्ये कोबी, टोमॅटो, मिरची,वांगी व वेल वर्गीय वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
परसबागेसाठी लागणारे सर्व साहित्य मुरगुड येथील आधुनिक शेतकरी श्री. संदीप भारमल यांनी दिले आहे.तसेच मशागत समाधान सातवेकर यांनी करून दिली आहे. शाळेचा कार्यभार उपमुख्याध्यापक प्रवीण आंगज यांनी घेतल्यापासून शाळेचा पट 106 वरून 186 वर जाऊन पोहचला आहे.
शिवाजी विद्यामंदिर ही शाळा मुख्याध्यापक सहपत्र झाली होती मात्र पटसंख्या वाढल्यामुळे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांची नियुक्ती होईल असे त्यांनी सांगितले .तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनीअनेक परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी बजावली आहे सध्या शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे .
यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय मेंडके व सर्व सदस्य,मुख्याध्यापक सुभाष जाधव, उपमुख्याध्यापक प्रवीण आंगज, अनिल बोटे , मकरंद कोळी, सविता धबधबे या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले .