व्यापारी नागरी पतसंस्थेचे संचालक शशिकांत दरेकर यांचा वाढदिवस उत्साहात

कुर ( जोतिराम पोवार ) : मुरगूड ता. कागल येथील नावाजलेली श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मा. श्री. शशिकांत दरेकर यांचा ५८ वा वाढदिवस संस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला

Advertisements

यावेळी बोलताना संस्थेचे जेष्ठ संचालक श्री. किशोर पोतदार म्हणाले, संस्थेच्या प्रगतीत आतापर्यंतच्या कार्यकिर्दीत त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्याचबरोबर गहिनीनाथ समाचारचे पत्रकार म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्या पुढील कार्यास संस्थेच्या वतीने दिर्घायुष्य लाभावे अशी ईश्वर चरणी मनोकामना त्यानीं व्यक्त केली.

Advertisements

यावेळी श्री. किरण गवाणकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री प्रशांत शहा, हाजी धोंडीराम मकानदार, साताप्पा पाटील, नामदेवराव पाटील, प्रदीप वेसणेकर, संदीप कांबळे, प्रकाश सणगर, नुतन संचालक निवासराव कदम, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी – श्री रणजीत मोरबाळे, श्री नितेश पाटील, श्री विनायक हजारे, श्री उद्धव संकपाळ, श्री देवराज कांबळे, महिला कर्मचारी – सौ सुरेखा डवरी, सौ स्वाती पाटील, सौ सिमा मगदूम, सौ सिमा जठार, सौ आश्विनी रणवरे आदी उपस्थित होते.

Advertisements
AD1

2 thoughts on “व्यापारी नागरी पतसंस्थेचे संचालक शशिकांत दरेकर यांचा वाढदिवस उत्साहात”

Leave a Comment

error: Content is protected !!