
पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील) : एकोंडी तालुका कागल येथे शेतकऱ्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी अडवत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही आणि हा मार्ग रद्द करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी केली .एकोडी भागातून मुश्रीफ यांचा संपर्क दौरा जाणार असल्याचे समजताच शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत गाडी अडवली .जोपर्यंत ठाम आश्वासन देत नाहीत तोपर्यंत गाडी पुढे सोडणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी मंत्री मुस्लिम यांनी कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत असे सांगितले.शक्तिपीठ महामार्ग झाल्यास मी राजीनामा देतो असे सांगत शेतकऱ्यांची समजूत काढली .
मुश्रीफ यांचा दौरा या भागात असल्याची समजतात एंकोडी परिसरातील अनेक शेतकरी रस्त्यावरती जमत म गाडी अडवली. यावेळी भागातील अनेक शेतकरी जमा झाले होते . शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही हे सांगत हा मार्ग रद्द करण्याची मागणी केली.

यावेळी आपल्याकडून जोपर्यंत ठोस निर्णय मिळत नाही तो पर्यन्त आपण आपली गाडी सोडणार नाही अशी भूमिका घेतली.त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी आपण यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहोत आणि हा महामार्ग रद्दच करणार तो पर्यन्त आपण शांत बसणार नाही अशी भूमिका मांडली. जर हा शक्तिपीठ महामार्ग रद्द केला नाही तर आपण राजीनामा देऊ अशी ग्वाही दिल्यानंतर शेतकऱ्यांनी गाडी पुढे सोडली.
यावेळी आनंदा पाटील ,संतोष पवार, विष्णू वैराट ,दिनकर लोंढे, सुभान वैराट, यशवंत मर्दानी ,बाळासो लोंढे ,संतोष लोंढे ,यशवंत सुळगावे ,विष्णू सुळगावे आदी सह अनेक शेतकरी उपस्थित होते.