सुळकूड (सुरेश डोणे) : राजर्षी शाहू महाराज हे पारंपारिक राजाच्या कल्पनेत बसत नाहीत,तर ते थोर व्यक्तिमत्व आहे. हा माणूस सामान्यातला सामान्य माणसांपर्यंत पोचून स्वतःला त्यांच्यामध्ये विरघळून टाकतो. त्यांचे व्यक्तिमत्व हे अनेक पदरी, अनेक पैलू असणारे होते. त्यांच्यामध्ये अनेक ऊर्जा केंद्र होती.या कर्तृत्वाचे वाचन, पुनर्वाचन होणे गरजेचे आहे.त्यांचे व्यक्तिमत्व हे व्यामिश्र असल्यामुळे या राजाचा शोध घेताना हजार वाटांनी जावे लागते.तरच किंचित काही प्रमाणात हा राजा समजून घेता येतो असे प्रतिपादन मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.ते श्री दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर येथे छत्रपती शाहू जयंती समारंभात अध्यक्षपदावरून बोलत होते ते, पुढे म्हणाले, शाहू राजा म्हणजे राजांमधील ऋषी,लोकांचा राजा, जनतेचा राजा, दिन दलितांचा कैवारी.
या जयंतीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार रोख रक्कम व पुष्प देऊन करण्यात आला.विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांच्या जीवनावरती नाटिका सादर केली ल,पोवाडा गायन झाले,मनोगती झाली.
या जयंतीसाठी शिवाजी कोकणे,अमोल कांबळे, बाळकृष्ण चौगुले,चंद्रकांत यादव सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या जयंतीचे प्रास्ताविक जे.बी.वैराट यांनी केले सूत्रसंचालन वेदांत थोरवत व हर्षवर्धन कांबळे यांनी केले तर आभार बी.बी.खाडे यांनी मानले.