सुळकूड ( प्रा.सुरेश डोणे ) : दूरदृष्टी असलेला राजा म्हणजेच छ.शाहू महाराज.राधानगरी येथे धरण बांधून भविष्यातील पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडविला.कलेला आपल्या दरबारी राजाश्रय देऊन बहुजन समाज्याला न्याय देण्याचे काम छ. शाहू महाराजांनी केले असे प्रतिपादन कोल्हापूर येथील विमल इंग्लिश हायस्कूल च्या सचिव लिना कर्तस्कर यांनी केले.
त्या छ.शाहू जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व द्विपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विजय चौधरी म्हणाले की,छ.शाहू राजे हे दिनदलितांचे, बहुजनांचे राजे होते.
शाहू महाराजांचा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक दृष्टिकोण हा पुढील पिढ्यांना आदर्शवत असा आहे.त्यामुळे त्यांचे कार्य हे महाराष्ट्रा पुरते मर्यादित नसून संपूर्ण जगभरात पसरलेले आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विध्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शुभांगी गाडगीळ यांनी केले तर आभार संकेत गांधी यांनी मानले.