मुरगूड ( शशी दरेकर ) – देशात मुली व महीलां वरील लैंगिक अत्याचार निश्चित रोखता येतील.त्यासाठीचे कायदे एकदम सशक्त व सक्षम आहेत.फक्त त्यांच्या मध्ये जागृति करण्याची गरज आहे.
अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे.कोलकत्या सारखा एखादा गंभीर प्रकार घडला तर देश पेटून उठतो हे आपण पाहिले आहे.लैंगिक अत्याचार म्हणजे विकृत स्वरूपाचा गुन्हा असतो.गुन्हेगाराला कसलाही धर्म नसतो.त्याला तर शिक्षा होतेच पण गुन्ह्यास प्रवृत्त करणाऱ्यांना सुध्दा कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.
हे कायदे मुलींना व महिलांना समजून सांगितले पाहिजेत म्हणजे गुन्ह्याची चाहूल लागताच त्यांना कायद्याचे संरक्षण मिळते.
लव्ह जिहाद हा प्रकार वाढत आहे.कट्टर पंथीय अशा प्रकारांना प्रोत्साहन देतात.मुलींना आकृष्ट करण्याचे अनेक प्रकार अवलंबिले जातात .त्यातून मुलींच्या निर्दयी खुनाचे प्रकार पण घडले आहेत हे सर्वज्ञात आहे.
असे प्रकार मुली आणि महिला रोखू शकतात.त्यासाठी आपल्या दैनंदिन आचरणात त्यांनी कांहीं बदल करणे आवशक आहे.एकटे न फिरणे, फॅशनच्या नावाखाली अंग प्रदर्शन टाळणे ,पोशाख ,रंगभूषा(मेकप) मुक्त केशभूषा (मोकळे केस) यामुळे वासनाधांची दृष्टी चळते व ते गुन्हाप्रेरित होतात.
कर्नाटकात तर असा प्रकार टोल नाक्याच्या जवळ झाला होता. गुन्हेगारांचा एन् काउंटर करण्यात आला होता.
आखाती देशात परवा सात जणांना शिरच्छेद करण्याची शिक्षा झाली.
गुन्हेगारांना सुध्दा कायद्याचे ज्ञान व भिती असेल तर हे प्रकार कमि होतील म्हणूनच कायदे विषयक जागृती अत्यंत आवशक आहे.
अँड . राणाप्रतापसिंह सासने यांनी विश्व हिंदू परिषदेच्या ६० व्या वर्धापना निमित्त झालेल्या प्रदीर्घ व्याख्यानात हे मुद्दे परखडपणे मांडले.
यावेळी सदर मेळाव्यात पी एस कुलकर्णी,जवाहर छाबडा,तुकाराम मांडवकर,दिलीप भिवटे शिवानंद महाराज, बाळ महाराज,हसमुख भाई शहा,श्रीकांत पोतनीस,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.