![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20241018-WA0038.jpg)
मुरगूड ( शशी दरेकर ) : जयसिंगपूर येथे झालेल्या शालेय विभागीय १४ वर्षाखालील रोलर स्केटिंग स्पर्धेत मुदाळ ता – भुदरगड येथील श्री प. बा. पाटील हायस्कूलचा इ .६ वीचा विद्यार्थी कु.वरद महेश सोरप (यमगे ता – कागल ) याने द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची अमेय क्लासिक क्लब यशवंतनगर विरार , पश्चिम मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यास सत्यजित मराठे व इंद्रजीत मराठे यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, आई आरती ,वडील महेश सोरप यांचे प्रोत्साहन लाभले.