कागल (विक्रांत कोरे) : जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर याच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या शासकीय राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथे करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये कागलच्या डी आर माने महाविद्यालयाचा विद्यार्थी कु. जय संदीप भांडवले यांने ७४ किलो वजन गटात प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक प्राप्त केले.
सदर स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची निवड मेरठ उत्तर प्रदेश येथे होणारे राष्ट्रीय स्पर्धेसाठी होते आहे.स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.नीला जोशी मॅडम, कॅम्पस डायरेक्टर प्रा डॉ प्रवीण चौगुले सर व संस्थेचे सेक्रेटरी प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने , जिमखाना विभाग प्रमुख डॉ प्रा श्रीनिवास पाटील व जूनियर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संग्राम तोडकर तसेच जिमखाना समितीचे सदस्य व कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याचे सहकार्य लाभले.