मुरगूड (शशी दरेकर) : कोनवडे ता भुदरगड येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या ( साई आखाडा ) सहा महिला मल्लांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे .त्यांची लातुर व कुरुंदवाड ( कोल्हापूर ) येथे होणाच्या राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच दोन महिला मल्लांनी द्वितीय तर एकीने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित कोनवडे ता भुदरगड येथे झालेल्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेतून राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेले कुस्तीगीर असे : 14 वर्षाखालील – प्रथम क्रमांक – सृष्टी रेडेकर ( 36 किलो ), गायत्री घाटगे ( 39 किलो ) , संतोष वेताळ ( 58 किलो ) सर्व विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूल मुरगूड ),सई भारमल ( 62 किलो ) प्रथम क्रमांक (कुर हायस्कूल कुर ), श्रावणी बापू शिनगारे (५० किलो), तृतीय क्रमांक (कुर हायस्कूल कुर )17 वर्षाखालील मुली – प्रथम क्रमांक – अपेक्षा पाटील ( 65 किलो ), भार्गवी सटाले (73 किलो) , द्वितीय क्रमांक – पूजा पाटील (57 किलो) , तृतीय क्रमांक अमृता सिसाळ (61 किलो) सर्व – विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कुल मुरगूड)
या विद्यार्थिनीना एनआयएस प्रशिक्षक दादासो लवटे , वस्ताद सुखदेव येरुडकर , दयानंद खतकर , सागर देसाई यांचे मार्गदर्शन तर संस्था सेक्रेटरी खास . संजयदादा मंडलिक , कार्याध्यक्ष अॅड वीरेंद्र मंडलिक , कार्यवाह आण्णासो थोरवत यांचे प्रोत्साहन लाभले.