विज्ञान दिनानिमित्य सिद्धनेर्ली विद्यालयात विज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शन

सिध्दनेर्ली : येथील सिद्धनेर्ली विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये विज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शन सम्पन्न झाले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्य याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विज्ञान आकृतींच्या संकल्पना स्पष्टीकरणासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम घेतल्याचे विज्ञान प्रमुख संदीप वर्णे यांनी सांगितले. या अनोख्या प्रदर्शनामध्ये 27 विद्यार्थ्यांनी आपली कलाकृती सादर केली 550 विद्यार्थ्यांना हे प्रदर्शन पाहून वैज्ञानिक दृष्टीकोन व आकृती संकल्पना समजण्यासाठी मदत झाली.

Advertisements

या प्रदर्शनात मानवी उत्सर्जन संस्था, मानवी हृदय, फुलांचे अंतरंग, प्रकाश संश्लेषण, आदी केंद्रकी पेशी, पाणी शुद्धीकरण, वनस्पती परिवहन संस्था आकृत्यांचे रेखाटन करण्यात आले होते. तसेच यावेळी विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धापैकी विज्ञान वादविवाद स्पर्धा “विद्यार्थ्यांना मोबाइल चा वापर योग्य आहे की अयोग्य ” ? या विषयावर संपन्न झाली.

Advertisements
AD1

1 thought on “विज्ञान दिनानिमित्य सिद्धनेर्ली विद्यालयात विज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शन”

  1. very nice news. विज्ञान दिनानिमित्य सिद्धनेर्ली विद्यालयात विज्ञान आकृती रांगोळी प्रदर्शन.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!