सिद्धनेर्ली : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली ,मौजे सांगाव व करनूर या तीन शाळा दिल्लीच्या धर्तीवर सीएसआर फंडातून उभारणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. सिद्धनेर्ली ता कागल येथील साडे दहा कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे उदघाटन, जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी मंत्री मुश्रीफ यांच्यासह संचालकपदी प्रताप माने यांच्या निवडीबद्दल सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले,लोकप्रतिनिधींनी गावातील विकासकामांचे नियोजन करावे. रस्त्यांच्या कामांआधी गावातील पाणी योजनांची कामे करावीत. येत्या काळात विविध प्रकारच्या ३६ महामंडळांची स्थापना करणार आहे. त्यामध्ये शेतमजुरांसाठीही महामंडळ असून त्याचे लाभ त्यांच्यासह सर्वच मंडळातील लाभार्थ्यांना देऊ अशी ग्वाही दिली. यावेळी प्रताप माने,युवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपिठावर पी.सी.मगदूम,उपसरपंच मनोहर लोहार, कृष्णात मेटील, माजी सरपंच एम.बी.पाटील, विलास पोवार, आदी उपस्थित होते. स्वागत रत्नप्रभा गुरव यांनी केले. प्रास्तविक सरपंच दत्तात्रय पाटील यांनी केले. आभार युवराज खद्रे यांनी मनले.