मुरगूड ( शशी दरेकर ) : एस टी कर्मऱ्यांनी त्यांच्या कांहीं मागण्यासाठी संप पुकरल्याच्या बातम्या टी व्ही व वर्तमान पत्रातून आल्या आहेत.त्याचा दाखला देत मुरगूड येथील स्थानक प्रमुखाने एस टी चा संप आहे तुम्हीं दुसरी व्यवस्था पहा असे शाळेच्या विद्यार्थ्यांना सांगितले .
त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले.सकाळी कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग भरत असतात .ते विद्यार्थी व विद्यार्थिनी साडे अकरा पर्यंत शाळेतून सुटतात व एस टी स्थानकावर येतात.त्यांचेकडे पास असतात. विद्यार्थिनींनी फ्री पास पण दाखवले.
शाळा करून त्यांना घरी जेवायला जायचे असते.ज्यांच्याकडे दुचाकी वाहने होती ते विद्यार्थी एका गाडीवर तीन चार अशा संख्येने गावी गेले.
कांहीं मुली चालत निघाल्या होत्या.त्यांना कागल बसच्या ड्रायव्हर व कंडक्टर यांनी त्यांना पुन्हा एस टी स्थानकात आणले. मुलींनी कॅन्टीन मध्ये कांहीं नाष्टा केला.कागल.मार्गावरील सर्व.विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना घेऊन जायची जबाबदारी त्यांनी उचलली.
स्थानक प्रमुख यांना त्यांनीच सांगितले की संपाला कोर्टाने मनाई केली आहे.सरकारशी पण वाटाघाटी सुरू आहेत.आपल्याला पण वरून कांहीं आदेश आलेला नाही.तेंव्हा विद्यार्थ्यांना चुकीचे सांगू नका.त्यांचे हाल होत आहेत.
दीडशे ते दोनशे विद्यार्थी स्थानकात उपाशी बसून होते. वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांचे हाल थांबवा अशी मागणी काहीं समाज सेवकांनी केली आहे.
Hi Neat post Theres an issue together with your web site in internet explorer may test this IE still is the marketplace chief and a good component of people will pass over your fantastic writing due to this problem