जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी शाळा प्राधान्यक्रम नोंदणीस प्रारंभ

कोल्हापूर : ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रक्रिया कार्यान्वित झाली आहे. या अनुषंगाने, ‘बदली अधिकार पात्र’ (टप्पा क्रमांक ४) मधील शिक्षकांना दिनांक २८ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाईन नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Advertisements

प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे की, शिक्षकांनी निवडलेल्या पर्यायांची पडताळणी करून आपला अर्ज अंतिम करावा आणि तो ऑनलाईन पोर्टलवर यशस्वीरित्या सबमिट झाल्याची खात्री करावी. अंतिम अर्जाची हार्डकॉपी जपून ठेवणे आवश्यक आहे. दिनांक २७ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरून प्रसिद्ध करण्यात आलेली सुधारित रिक्त पदांची यादी शिक्षकांना त्यांच्या लॉगिनवरून उपलब्ध असेल.

Advertisements

या संवर्गातील पात्र शिक्षकांना नमूद कालावधीत शाळांचा प्राधान्यक्रम अत्यंत काळजीपूर्वक निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण दिनांक ३१ जुलै २०२५ नंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शिक्षकांवर राहील, असेही डॉ. शेंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!