कागल (सलीम शेख) : महाराष्ट्र जनहित पत्रकार संघाने अझरुद्दीन ताशिलदार यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. समाजातील विविध घटकांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर असलेले ताशिलदार यांचे कार्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे.
Advertisements
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी ७६ दिवस कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा करून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सर्व समाजातील शेकडो गरजू,गरीब, अपंग, पेशंट व अनाथांना गरजेच्या वेळी योग्य ती आर्थिक व वस्तू स्वरूपात नेहमी मदत असते.त्यांच्या या समाजसेवेबद्दल संपूर्ण परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
Advertisements

AD1