महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त समाजवादी प्रबोधिनीचा कृतज्ञता सोहळा
मुरगूड ( शशी दरेकर ) : “शाहू महाराज खऱ्या अर्थाने “फिलॉसॉफर किंग” होते. आपल्या करवीर संस्थानात स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्ये आचरणात आणून ते जागतिक पातळीवरील सर्वश्रेष्ठ लोकशाहीवादी राजे ठरले”,
असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांनी केले.
समाजवादी प्रबोधनीच्या मुरगुड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती सोहळ्यात ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराजांनी मुरगूड आणि परिसरातील लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी उभारलेल्या सर पिराजीराव घाटगे तलावातील पहिल्या नळ पाणी पुरवठा योजनेला या वर्षी 102 वर्षे पूर्ण झाली.शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत महाराजांच्या हस्ते लोकसमर्पण करण्यात आलेल्या पहिल्या नळ योजनेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
डॉ. कुंभार म्हणाले,” किशोरावस्थेत असताना शाहू महाराजांनी स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्तानचा 5 हजार किमीची भ्रमंती केली. भारतातील लोकांचे दुःख, दैन्य,दारिद्र्य आणि शोषण पाहून लहान वयातच त्यांच्या मनात सामाजिक क्रांतीची बीजे रोवली गेली.पाश्च्यात्य विवेकी शिक्षण आणि भारतीय संस्कृतीतील समतावादी प्रवाह यांच्या अध्ययनातून त्यांची जडणघडण झाली.राजवैभव त्यागून आपली सत्ता संपत्ती गरीब व दुःखी रयतेसाठी खुली करणारे महाराज दुसरे बुध्द आहेत.”
संदीप घार्गे म्हणाले,” शाहू महाराजांची ” दूरदृष्टीमुळे कोल्हापूरचे आर्थिक,सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक स्थान निर्माण झाले.”
स्वागत प्रबोधिनीचे मुरगूड शाखेचे अध्यक्ष बबन बारदेस्कर, प्रास्ताविक दलीतमित्र डी.डी. चौगले यांनी केले.सूत्रसंचालन समीर कटके यांनी आभार बी.एस.खामकर यांनी मानले.
यावेळी दिग्विजय पाटील,ॲड.सुधीर सावर्डेकर,दलितमित्र एस आर बाईत, जोतिराम सुर्यवंशी ,बाळासो मांगले,रामचंद्र सातवेकर, रुक्मिणी कांबळे,मोहन कांबळे,भिकाजी कांबळे,निलेश खरात,प्रा.चंद्रकांत जाधव,विजय सापळे,विलास भारमल,संजय घोडके,रंगराव चौगले,सर्जेराव भाट,एम टी सामंत,पांडुरंग गायकवाड,एम आर घाटगे,गणपतराव मांगोरे,सदाशिव एकल यांचेसह नागरीक उपस्थित होते.