मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील हतात्मा तुकाराम भारमल वाचनालयात बुधवार दि. २/१०/२४ रोजी सकाळी ९.३० वाजता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्य अभिवादन करण्यात आले.
मुरगूड येथील महालक्ष्मी किराणा स्टोअर्सचे सर्वेसर्वा मा . श्री . चंद्रकांत दरेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व कोल्हापूर जिल्हा ग्राहक बेकर्सचे विद्यमान संचालक मा . श्री . महादेव साळोखे यांच्या हस्ते लालबहादूर शास्त्री प्रतिमेचे पूजन करून या महान विभूतीनां पूष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले .
यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी नगरसेवक एस .व्ही. चौगले, किरण गवाणकर यानी महात्मा गांधी व लालबद्दूर शास्त्री यांच्या आठवणीनां उजाळा दिला . या अभिवादन प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष जयशिंग भोसले , राजेंद्र कांबळे , जनार्दन कांबळे, बाजीराव मगदूम , संदिप वरपे , सौ . शुभांगी वंडकर , सौ . रेखा भारमल, वाचनालयाचे कर्मचारी व वाचकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.